spot_img
spot_img

कढी – भात खाल्ल्याने तब्येत बिघडलेल्या १३ विद्यार्थिनींना रुग्णालयातून सुट्टी! – जिल्हा शल्य चिकित्सक म्हणाले सर्वांची प्रकृती स्टेबल!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) पैनगंगा आदिवासी शाळेत काल रात्री कढी- भात खाल्ल्याने १३ विद्यार्थिनींची तब्येत बिघडल्याची घटना काल घडली होती. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्या १३ पैकी ८ विद्यार्थिनींना काल तर आज सकाळी ५ विद्यार्थिनींना सुट्टी देण्यात आली आहे.सर्वांची प्रकृती स्टेबल असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी ‘हॅलो बुलढाणा’ ला सांगितले.

येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रमशाळेत कढी भात खाल्ल्यानंतर १३ विद्यार्थ्यांनींना उलटी-मळमळ व पोट दुखीचा त्रास होत असल्याची बातमी समोर आली होती. जिल्हा सामान्य रुग्णालयात ८ विद्यार्थिनींवर उपचारानंतर त्यांना शुक्रवारी घरी सोडण्यात आले होते.आज सकाळी देखील ५ विद्यार्थिनींना उपचार करून सोडण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!