डोणगाव (हॅलो बुलडाणा/अनिल राठोड) संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचा संदेश दिला परंतु, या संदेशाचे कुठे कुठे पालन होतांना दिसत नाही. डोणगाव ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य नांदत असून, आजाराला आमंत्रण मिळत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने स्वच्छते संदर्भात योग्य पावले उचलून, सार्वजनिक आरोग्य जपावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून डोणगाव ग्रामपंचायतकडे बघितल्या जाते.विशेष म्हणजे येथील ग्रामविकास अधिकारी तत्पूर्वी निलंबित झाले असून,गावातील विकासकामेच रेंगाळली आहेत.
ग्रामपंचायतीची उदासीनता पाहता,येथील आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.त्यामुळे व्यवसायिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून,साथ रोगांना आमंत्रण मिळत आहे. बाजाराच्या मागे भुसार यांच्या दुकानासमोर तसेच मटन मार्केट जवळ व मुत्रीघराजवळ प्रचंड घाण व दुर्गंधी असल्याने ग्रामस्थ व्यावसायिक पुरते हैराण झाले असून सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.