बोराखेडी (हॅलो बुलडाणा) जेसीबी विक्रीच्या सौद्यातून फसवणूक झाल्याची तक्रार कुर्बान शहा मिस्किन शहा रा. कोथळी यांनी बोराखेडी पोलीस स्टेशनला दिली आहे.
तक्रारीनुसार, कुर्बान शहा मिस्किन शहा यांच्या मालकीची जेसीबी विक्रीचा सौदा शेख नासिर शेख बशीर रा. कोथळी ता. मोताळा यांच्या सोबत पक्का झाला होता.तेव्हा जेसीबी ऑपरेटर पवन माळी रा.रामगाव तांडा ता. मोताळा हा सोबत होता. 15 जुलै 2024 रोजी 6,00,000 रुपये नगदी देण्यात आले होते.सदर वाहनावर चोला मंडळ फायनान्स कंपनीचे 29,50,000 रुपये कर्ज होते.सदर रक्कम शेख नासिर शेख बशीर व्याजासह भरणार असे त्यांनी सौदापत्रकात कबूल केलेले होते.तसेच वाहन निल होईपर्यंत ते वाहन कुर्बान शहा मिस्कीन शहा यांच्या नावावर राहील व वाहनाचे कर्ज निल झाल्यानंतर ते वाहन शेख नासीर शेख बशीर यांच्या नावे करून देणार असे ठरले होते.15 जुलै 2024 पासून सदर जेसीबी शेख नासीर शेख बशीर यांच्या ताब्यात दिली असून वाहनाची मूळ आरसी बुक सुद्धा दिले आहे.परंतु ते वाहनाचे नियमित हप्ते भरत नाहीत.त्यामुळे त्यांना याचा जाब विचारला असता त्यांनी जेसीबी तिसऱ्या व्यक्तीला विकल्याचे सांगून आता मी हप्ते भरणार असल्याचे ठणकावत कुर्बान शहा मिस्कीन शहा यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत धक्काबुक्की केली.त्यांच्या वडिलांना सुद्धा मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.जेसीबी ऑपरेटर पवन माळी याला सध्या जेसीबी कुठे आहे विचारले असता तो सांगायला तयार नाही. त्यामुळे पवन माळी व शेख नासिर शेख बशीर या दोघांनी तिसऱ्याशी संगणमत करून फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.मला माझी जेसीबी परत मिळावी अशी मागणी कुर्बान शहा मिस्किन शहा यांनी बोराखडी पोलिसांना केली आहे.