बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.मंगळवारी खराब जेवण दिल्याच्या कारणावरून गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला अमानुषपणे मारहाण केली होती. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. नागरिक, सामाजिक संघटना व विरोधी पक्षांनी संतप्त प्रतिक्रिया देत, गायकवाड यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली होती.
या दबावाला बळी पडत अखेर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आ.संजय गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 352, 115(2) 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.