बुलढाणा (हॅलो बुलडाणा) कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीच्या प्रकरणावरून शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातून टीका होताच, आमदार संजय गायकवाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. पत्रकारांनी प्रश्न विचारताच त्यांनी थेट सामना आणि संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. “त्या सामनाला कोण हुंगते का? संजय राऊतला कोण हुंगते का?” असा घणाघात करत त्यांनी सामनाची भूमिका फोल असल्याचा आरोप केला.
गायकवाड पुढे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली, तेव्हा पहिलं आंदोलन साउथ इंडियन लोकांविरुद्ध झालं. ज्यांनी मुंबईत घुसून बार डान्स सुरू केले, मराठी संस्कृतीचा र्हास केला. आज तुम्ही त्याच साउथ इंडियन शेट्टीच्या पाठीशी उभे राहता? इकडे मराठी-मराठी करता आणि तिकडे त्या शेट्टीवर एवढा पुळका का? तो शेट्टी काय संजय राऊतचा मायचा नवरा आहे का?” असा प्रश्न विचारत त्यांनी राऊतांवर थेट हल्ला चढवला.
“मी जे केलं ते योग्य केलं. तो शेट्टी आहे म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय? सामनाच्या टीकेला सडेतोड उत्तर देताना संजय गायकवाड यांनी विरोधकांची बोलती बंद केली असून, त्यांच्या या आक्रमक विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.