spot_img
spot_img

💥इम्पॅक्ट! ‘हॅलो बुलडाणा’ च्या बातमीचा स्फोट! – अवैध गॅस रिफील करणाऱ्यांचे धाबे दणाणले! – तब्बल तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) ‘बुलढाणाच्या छाताडावर अवैध सिलिंडरचा धंदा!’ या या मथळ्याखाली काल बातमी प्रसारित करताच प्रशासनाने दखल घेत,धडाकेबाज कारवाई करीत तब्बल ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

जळगाव जामोद शहरातील अंबिका टाइल्स च्या पाठीमागील एका घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्यावर पुरवठा विभाग व जळगाव जामोद पोलीस पथकाने छापा टाकत या ठिकाणाहून पाच सिलेंडर, तीन इलेक्ट्रिक मोटर, एक वजन काटा यासह ज्या वाहनात घरगुती गॅस भरला जात होता ती मारुती सुझुकी कंपनीची एम एच २८ बीके ०७५८ क्रमांकाची ईको गाडी असा एकूण ३ लाख २९ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तहसील विभागाचे नायब तहसीलदार गायकवाड तसेच पुरवठा निरीक्षक आठवले यांच्यासह पीएसआय नारायण सरकटे, पीएसआय अमोल पंडित, पीएसआय नागेश खाडे पीएसआय राजकुमार कांबळे यांनी ही धडक कारवाई केली. एका आरोपीसह हा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी सय्यद साबीर सय्यद शकुर रा. राणी पार्क जळगाव जामोद याला अटक करण्यात आली आहे. यासंबंधीची फिर्याद नायब तहसीलदार सुधीर कुमार गायकवाड यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ व ७ कलम ४(१)(A) नुसार कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई नायब तहसीलदार पुरवठा विभाग सुधीरकुमार गायकवाड, पुरवठा निरीक्षक आठवले, पीएसआय नारायण सरकटे, पीएसआय अमोल पंडित, पीएसआय नागेश खाडे, पीएसआय राजकुमार कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत भिसे, अयुब शेख शेख यांनी केली आहे. या कारवाईमुळे जळगाव जामोद तालुक्यातील वाहनांमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर करून गॅस भरणा करणाऱ्यांमध्ये धाक निर्माण झाला असून कारवाईच्या भीतीपोटी वाहनांमध्ये अवैध गॅस भरणा केंद्रे बंद केली आहेत.

▪️बुलढाण्यात कधी कारवाई?

बुलढाणा शहरात देखील अवैध गॅस चा धंदा बोकाळला आहे.मुख्यालय असून देखील येथील तहसीलदार व पुरवठा अधिकारी सुस्त दिसून येतात.वाहनांमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर करून गॅस भरणा करणारे रहिवासी भागात मोकाट असून, एखादी अनुचित घटना घडली तर याला जबाबदार कोण राहील? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!