बुलढाणा (हॅलो बुलडाणा) अलीकडे गांजाचा धूर आणि दारूचा महापूर जिल्ह्यात वाहतोय…पोलिसांच्या वेळोवेळीच्या कारवाईवरून हे स्पष्ट होतेय.. 9 जुलैला लोणार येथील बंजारा तांड्यात 1,06,440 रुपये किमतीचा
मादक पदार्थ 5.322 ग्राम गांजा जप्त करून एलसीबीच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.गणेश जाधव 50 रा. बंजारा तांडा लोणार, जि. बुलढाणा असे आरोपीचे नाव आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने मादक पदार्थ बाळगणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात सदर मोहीम हाती घेण्यात आली आहे.दरम्यान लोणार येथील बंजारा तांड्यात आरोपी गणेश जाधव हा राहत्या घरात अवैधरीत्या गांजा बाळगून असल्याची पक्की खबर मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपी कडील 1,06,440 रुपये किंमतीचा 5.322 ग्राम गांजा हस्तगत केला आहे.आरोपी विरुद्ध कलम 8 क, 20 ब,(ii)(2), एनडीपीएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा व खामगाव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात एपीआय संजय मातोंडकर, एएसआय ओमप्रकाश सावळे, राजकुमार राजपूत, हेडकॉन्स्टेबल दिगंबर कपाटे, वनिता शिंगणे, मंगेश सनगाळे, दीपक वायाळ, निवृत्ती पुंड,संतोष चव्हाण, अनिल शिंदे,गजानन डोईफोडे या पथकाने केली आहे.