spot_img
spot_img

💥EXCLUSIVE “हिम्मत असेल तर मंत्र्याला मारा!” – अनिल परबांचा संताप; फडणवीसांचा इशारा

मुंबई (हॅलो बुलडाणा) “कर्मचाऱ्याला मारता? हिंमत असेल तर मंत्र्याला मारा!” असा संतप्त सवाल करत शिवसेना (ठाकरे गट) आमदार अनिल परब यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या कृत्यावर विधानपरिषदेत चांगलाच हल्ला चढवला. “जे कर्मचारी आपली सेवा करतात, त्यांच्यावर हात उचलणाऱ्यांचं तुम्ही समर्थन करणार का?” असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अशा आमदारांचं निलंबन करण्याची मागणी केली.अनिल परब यांचे रोखठोक विधान सभागृहात गाजले. “एका आमदाराने कसं राहावं यालाच भान नाही. बनियन आणि टॉवेलवर राडा करतो. ही आमदाराची शान आहे का? रस्त्यावर राहता काय?” असा उपरोधिक टोला परब यांनी लगावला.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. “मी याबाबत सविस्तर माहिती घेतली आहे. भाजीला वास येत होता, अशी तक्रार होती, परंतु मारहाण करणे अजिबात योग्य नाही,” असे स्पष्ट करत फडणवीस म्हणाले, “लोकप्रतिनिधीच जर असा पायंडा पाडतील, तर समाजात चुकीचा संदेश जाईल. सभापतींनी यावर योग्य ती कारवाई करावी.”

नेमकं प्रकरण काय?

८ जुलै रोजी रात्री, आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड (शिंदे गट) यांनी जेवणातील डाळ-भात शिळे असल्याचा आरोप करत कॅन्टीन व्यवस्थापकास शिवीगाळ व मारहाण केली. यापूर्वीही त्यांनी अन्नावर तक्रार केली होती, अशी कबुली त्यांनी माध्यमांसमोर दिली आहे. मात्र आता संपूर्ण घटनेवर राजकीय वादंग उसळला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!