बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ड्रायव्हरने विश्वासाने मालकाचे 12 लाख उडविले. या फसवणुकी बाबत तक्रार करण्यात आली आहे.
रमेशसिंग भिकनसिंग राजपुत वय 80 वर्ष रा. बुलढाणा रोड, वानखेडे पेट्रोलपंपाचे जवळ मलकापुर वाकोडी ता. मलकापुर जि. बुलढाणा यांनी तक्रारीत म्हटले की, आरोपी नरेंद्रसिंह
मंगलसिंग गौर वय 50 वर्ष रा. गणपती नगर भाग 5 मलकापुर वाकोडी ता. मलकापुर जि. बुलढाणा यांनी फसविले आहे.
पुढे ते म्हणाले, माझेकडे एम. एच. 28 व्ही. 5385 झायलो कार आहे. या कारवर मला ड्रायव्हरची आवश्यकता होती
माझा नातेवाइक नरेंद्रसिंह गौर याला कामाची आवश्यकता असल्याने मी त्याला माझेकडे ड्रायव्हर
म्हणुन काम दिले. तो गेल्या एक वर्षापासुन तो माझेकडे ड्रायव्हर म्हणुन काम करीत होता
तेव्हापासुन त्याने मी सांगितलेले छोटे मोठे काम करून माझा विश्वास संपादन केला त्यामुळे त्याला
माझे घरात वापरण्याची पर्ण मुभा होती. माझी तहसील चौक मलकापुर येथे जागा होती.ती मी
दि. 30/11/2023 रोजी गजानन चव्हाण व नितीन पवार यांना 13,00,000/-रु.ला विकली होती.ते तेरा
लाख रूपये हे मला रोख रक्कम दिली होती तसेच मी ते माझे घरात आणुन ठेवले होते.त्यापैकी
1लाख रूपये खर्च झाले आणखी पैसे विनाकारण खर्च होवु नये म्हणुन दि. 08/02/2024 रोजी उर्वरीत 12,00,000/-रूपये हे माझे भारतीय स्टेट बँक मलकापुर येथील खात्यात जमा करण्या साठी नरेंद्रसिंग मंगलसिंग गौर याला दिले होते त्यावेळी माझे बरोबर निलेशसिंग देवीसिंग गौर व कृष्णकुमारसिंग सचिनसिंग राजपुत हे हजर होते. नरेंद्रसिंग गौर याने सदरची रक्कम बँकेत न भरता
मला माझे खात्यात जमा केल्याचे सांगितले परंतु काही दिवसाने मला पैशांची आवश्यकता असल्याने माझे खात्यामधून पैसे काढण्याकरीता गेलो असता सदरचे 12 लाख रुपये माझे खात्यात जमा न केल्याचे समजले यावरून नरेंद्रसिंग गौर याने माझा विश्वासघात करून अफरातफर केले असल्याचे माझे लक्षात आल्याने मी नरेंद्रसिंग गौर याचेकडे विचारणा केली असता त्याने पैसे परत करतो असे म्हणुन माझेकडे वारंवार वेळ मागीतला तो माझा नातेवाइक असल्याने त्याला वेळ दिला परंतु त्यानंतर आता तो पैसे देण्यास टाळाटाळ करून मला तुमचेकडुन होत असेल ते करून घ्या तुम्ही
जर पैसे मागितले तर मी आत्महत्या करेल व तुमचे नाव चिठ्ठीत लिहून तुमचे पुर्ण घरादाराला
जेल मध्ये अटकाविल अशी धमकी दिली. अशा प्रकारे नरेंद्रसिंग गौर याने माझा विश्वासघात करून 12 लाख रुपयांची फसवणुक केल्यामुळे माझी त्याचे विरुध्द तक्रार आहे.