धाड (हॅलो बुलडाणा) जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने अवैध धंद्यांनाआळा घालण्याचे फार्मन सुटल्यापासून,सर्वच पोलीस विभाग सतर्क झाले असून, कारवाई करण्यासाठी सज्ज झालेत.दरम्यान धामणगाव बडे पोलीस स्टेशन अंतर्गत प्रतिबंधक गुटखा कारवाई करण्यात आली असून,तब्बल दोन लाख 89 रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे.ही करावी ८ जुलै रोजी करण्यात आली.
शहरासह जिल्ह्यात अवैध धंदे अद्यापही फोफावले आहेत.पोलीस प्रशासनाला बरीच कसरत करावी लागणार आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे आल्यापासून ते आपल्या धडाकेबाज कारवाईचा परिचय देत आहेत.काल देखील धामणगाव बढे पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गुटखा जप्तीची कारवाई करून एका आरोपीला अटक करण्यात आली.याप्रकरणी 2,89,840रुपयांचा मुद्देमाल व एक पांढऱ्या रंगाची 5,00,000किमतीची बोलेरो असा एकूण 7,89,840रुपयांचा मध्यमान हस्तगत करण्यात आला आहे.दीपक लेकरूवाळे,शेख चांद,गणेश पाटील, गजानन गोरले या पथकाने ही कारवाई केली.