spot_img
spot_img

कँटिनमधील जेवणावरून संतापले; आमदार संजय गायकवाडांचा राडा – कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल!

मुंबई (हॅलो बुलडाणा) शिवसेनेचे बुलढाणा मतदारसंघातील आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यंदा कारण ठरलंय आमदार निवासातील कँटिनमध्ये घडलेली धक्कादायक घटना! निष्कृष्ट जेवणावरून गायकवाड यांनी थेट कँटिनमध्ये जाऊन कर्मचाऱ्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

घटना अशी की, आमदार गायकवाड यांनी खोली क्रमांक १०७ मध्ये जेवण मागवले होते. मात्र, डाळीतून वास येत असल्याने आणि काही जणांचे पोट बिघडल्याची तक्रार मिळाल्यानंतर संतप्त गायकवाड थेट कँटिनमध्ये पोहोचले. तेथील कर्मचाऱ्याला डाळीचा वास घेऊन बघ, असं म्हणत कानशिलात लगावली आणि नंतर बुक्क्यांनी मारहाण केली.या घटनेदरम्यान संबंधित कर्मचारी माफी मागत होता, तरीही आमदार गायकवाड यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. आमदार निवासासारख्या सुरक्षित आणि शासकीय ठिकाणी एका लोकप्रतिनिधीकडून अशी वर्तणूक धक्कादायक मानली जात आहे अशी प्रतिक्रिया विरोधकांकडून उमटत आहे सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत असून, यावर नागरिक आणि विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कायदेशीर कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!