spot_img
spot_img

गॅसचा व्यवसाय की स्फोटकांचा खेळ? – जळगाव जामोद धोक्याच्या छायेखाली – शहराच्या छाताडावर चालतोय जीवघेणा गॅस धंदा!

जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद तालुक्यात अवैध गॅस भरणा अड्ड्यांचा सुळसुळाट झाला असून, घरगुती सिलेंडरमधील गॅस रिक्षा, स्कूल बस, चारचाकी वाहनांमध्ये भरला जात आहे. हे सर्व प्रकार रहिवासी भागात ठिकठिकाणी उघडपणे सुरू असून, त्यातून दुर्घटनेचा धोका गडद झाला आहे.

विशेष म्हणजे हे धोकादायक व्यवहार शहराच्या हृदयस्थानी सुरू असूनही पुरवठा विभाग व पोलिसांकडून संपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे. दररोज २० ते ३० सिलेंडर अनधिकृतरीत्या रिफिल केले जात असून, त्यातून मोठ्या आर्थिक उलाढालीसह जिवीतहानीचा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते निलेश तेलंगळे यांनी ३० जून रोजी तहसीलदार व पुरवठा विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.शहरातील हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या, धाबे येथे सर्रासपणे घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर केला जात असून, एजन्सीतील दलालांमार्फत शेकडो सिलेंडर काळ्या बाजारात विकले जात आहेत. या सर्व प्रकारांकडे प्रशासन हेतुपुरस्सर डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे.जर प्रशासनाने कारवाई न केली, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निलेश तेलंगळे यांनी दिला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!