spot_img
spot_img

💥विठ्ठला अनर्थ टळला रे! – बस डिव्हायडरला धडकली! 30 वारकरी किरकोळ जखमी! – ‘हॅलो बुलढाणा’च्या हाती जखमींची यादी!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) पंढरपूरवरून परतलेल्या विठ्ठलभक्तांच्या वाटेत आज पहाटे 2 वाजता दुर्घटना घडली.आषाढी वारीहुन भाविकांना घेऊन परतणाऱ्या एसटी बसला चिखली नजीक चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस डिव्हायडरला धडकून पलटली झाली.सुदैवाने विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन आलेल्या या भाविकांची अपघातात जीवित हानी झाली नाही.मात्र 30 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

एम.एच. 40 वाय 5830 क्रमांकाची ही एसटी बस चिखलीजवळील महाबीज समोर आली असता चालकाचे नियंत्रण सुटून बस रोडच्या दुभाजकावर जाऊन पलटी झाली. ही घटना रात्री साधारणतः 2 वाजेच्या सुमारास घडली.
बसमध्ये एकूण 51 प्रवासी होते, तसेच चालक आणि वाहक मिळून 53 जणांचा प्रवास होता. या अपघातात एकूण 30 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेल्या या रुग्णालयात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे प्राथमिक उपचारानंतर 15 जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलवण्यात आले.

▪️बुलढाणा येथे हलवण्यात आलेले जखमी प्रवासी..

भाऊसाहेब शोनाजी धांडे (वय ४५, रा. तळेगाव). पुष्पा विनोद शिंगणे (वय ३९, रा. तेल्हारा). प्रदीप रघुनाथ धर्मसकर (वय ४८, रा. दहीगाव). विठ्ठल तुलसीराम पांडे (वय ३७, रा. तळेगाव), रामप्रसाद हरिभाऊ पांडे (वय ६०, रा. तळेगाव),सुरेश दिगंबरराव फोकमारे (वय ६०, रा. सवदंरा), शोभा झोरे (वय ६०, रा. जानोरी रोड), गोविंद वासुदेव पांडे (वय ६०, रा. वडेगाव),तुकाराम पांडुरंग कोकरे (वय ६९, रा. बाळापूर), ईश्वर हरिचंद्र मोरे (वय ६५, रा. जवळा),रुख्मीनाबाई वसंत इंगळे (वय ६२, रा. बाळापूर), सुजाता राहुल वानखेडे (वय ३०, रा. चिखली),शिवाजी सुभाष जाधव (वय ३२, रा. अन्वा),नर्मदा अवचिंतराव मोरे (वय ४५, रा. मिराळवाडी, चिखली),आकाश अशोक डोके (वय ४५, रा. मंगरुळ-नवघरे),

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!