बुलडाणा (हॅलो बुलडाणा) सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ।। विठुरायाच्या चरणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सपत्नीक नतमस्तक होऊन सर्वांना चांगल आयुष्य,आरोग्य लाभो आणि बळीराजासाठी चांगला पाऊस पडू दे… असे साकडे विठू चरणी घातले.
आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी लाखो भाविक व वारकरी दिंडया श्री.क्षेत्र पंढरपूर येथे जाऊ विठूराया चरणी नतमस्तक होतात. डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या भक्तीमय सोहळ्यासाठी राज्यातील काना कोपऱ्यातुन लाखो वारकरी विठ्ठल नगरीत विठ्ठला चरणी नतमस्तक होण्यासाठी एकवटतात. आषाढी एकादशी निमित्त केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी श्री. पांडुरंगाचे मनोभावे दर्शन घेतले. देशातील प्रत्येक नागरिकांना चांगले निरोगी आयुष्य मिळूदे… अन्नधान्य पुरवणाऱ्या बळीराजासाठी दमदार पाऊस होऊ दे …असे साकडेही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी विठुराया चरणी घातले. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषि प्रतापराव जाधव उपस्थित होते.
▪️केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांची विठूराया चरणी सलग 43 वी वारी!
देशाचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव हे विठुरायाचे परमभक्त आहेत. कोरोनाचा दोन वर्षाचा कार्यकाळ सोडला तर गेल्या 43 वर्षापासून ते आषाढी एकादशीला नियमितपणे विठू चरणी नतमस्तक होण्यासाठी जात असतात..प्रत्येक भारतीयांना निरोगी आयुष्य लाभु दे … बळीराजाला सुखी ठेव… चांगला पाऊस पडू दे .. असं साकड त्यांनी आपली 43 वी वारी पूर्ण करताना विठ्ठल चरणी घातलं.