बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जलंब पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीच्या गुन्ह्यातील 2 अट्टल गुन्हेगारापैकी समाजविघातक कृत्य करणारा अंकूश उर्फ ‘व्हायरस’ गणेश देशमुख (वय 29 वर्ष) रा.घरकुल रावण टेकडी खामगाव जि. बुलढाणा याला एलसीबीच्या पथकाने जेरबंद बंद केले आहे तर त्याचा एक साथीदार सध्या फरार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जलंब पोलीस स्टेशन हद्दीत 5 जुलै रोजी चोरी च्या गुन्ह्याचा तपास करीत असतांना, सदर ‘व्हायरस’ पोलिसांच्या हाती लागला. मोटरसायकल चोरी,मोबाईल चोरी व वयोवृद्ध महिलेला पोलीस असल्याची बतावणी करून तिच्या जवळील दागिने, मोबाईल व नगदी पैशाची चोरीचे करणारे एकूण 2 आरोपी या गुन्ह्यात निष्पन्न झाले आहे. व्हायरस उर्फ गणेश देशमुख या आरोपीला ताब्यात घेऊन 5 गुन्ह्यांची उकल करण्यात आली. आरोपीकडून 1,37,900 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, एक बजाज कंपनीची पल्सर दोन मोबाईल असा एकूण 2,32,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीची पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वातील एपीआय यशोदा कणसे, एचसी एजाज खान, एनपीसी अनंता फरताळे,पीसी अजीस परसूवाले, मंगेश सनगाळे, निवृत्ती पुंड, राजू आडवे, कैलास ठोंबरे यांनी केली.