जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) ‘आई, दामिनी ताई सध्या काय करते?’ पोलीस गाडीतून फिरते..शाळा परिसरात कधी कधीच दिसते..त्यांना पगार भेटतो ना गं!टवाळखोरांवर कारवाई का होत नाही?’ असे लहान- मोठे विद्यार्थी प्रश्न विचारात असल्याने, महिला व युवतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जळगावात बुलेट रोड रोमिओंचा हैदोस सुरु आहे.शालेय विद्यार्थिनींसह, महाविद्यालयीन युवती व महिला त्रस्त झाल्यात. शहरात अनेक दिवसांपासून बुलेट दुचाकी धारक रोड रोमिओंचा हैदोस सुरू असून शालेय विद्यार्थीनीसह, महाविद्यालयीन युवती, महिला यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.यामध्ये महाविद्यालय वेळ संपल्यानंतर घरी परतणाऱ्या विद्यार्थिनी रस्त्याने जाताना पाठीमागून बुलेट दुचाकी धारक जवळ येऊन कर्कश आवाज मुद्दामहून करतात तसेच मुद्दामहून हा…. हुं…. करीत हैदोस निर्माण करत असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनी सह शहरातील विद्यार्थिनी व महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.
वाहतूक पोलिस कर्मचारी व दामिनी पथक यांनी ऍक्शन मोडवर येऊन रोड रोमिओंना प्रतिबंध करून कारवाई करावी अशी मागणी शालेय विद्यार्थिनी, महाविद्यालयीन युवती व महिला यांच्याकडून करण्यात येत आहे.
▪️दामिनी पथकाची प्रमुख कामे!
महिलांवरील अत्याचारांना आळा घालणे हे प्रमुख काम दामिनी पथकाचे आहे. महिलांवरील लैंगिक छळ, विनयभंग, मारहाण आणि इतर अत्याचारांना आळा घालण्यासाठी गस्त घालते आणि तत्काळ कारवाई करते.
सार्वजनिक ठिकाणी, शाळा, कॉलेज आणि इतर ठिकाणी दामिनी पथक गस्त घालून महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करते.दामिनी पथक अडचणीत सापडलेल्या महिलांना मदत करते आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवते.दामिनी पथक महिलांच्या मदतीसाठी २४ तास उपलब्ध असते आणि त्यांना तत्काळ प्रतिसाद देते. दामिनी पथक गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आणि महिलांवरील गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करते.दामिनी पथक महिलांना त्यांच्या कायदेशीर हक्कांबद्दल आणि सुरक्षिततेच्या उपायांबाबत माहिती देण्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करते.