spot_img
spot_img

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा विजय! मागण्या मान्य; आमरण उपोषणाची यशस्वी सांगता!

जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृह, जळगाव जामोद येथील विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून ये-जा करण्यासाठी योग्य रस्त्याचा अभाव आणि परिसरात अंधारमय वातावरणाचा सामना करावा लागत होता. वस्तीगृहाकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करणे आणि हायमास्ट लाईटची व्यवस्था करणे या दोन मूलभूत मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन, बुलढाणा जिल्हा यांच्यातर्फे दृढ निर्धाराने आणि टोकाच्या स्वरूपात आमरण उपोषण सुरू करण्यात आले.

मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, त्यामुळे निर्णायक पाऊल या मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांनी ३० जून २०२५ पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. मागील वर्षभर सातत्याने प्रशासन दरबारी पाठपुरावा करूनही केवळ आश्वासनांपुरतेच उत्तर दिले जात होते. या मुद्द्याला गांभीर्याने घेऊन प्रशासनाच्या झोपेचं सोंग फोडण्यासाठी हे टोकाचं पाऊल उचलण्यात आलं.
उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी मिळाले लेखी यश आंदोलनाच्या प्रखरतेमुळे दि. १ जुलै रोजी प्रशासनाला तात्काळ दखल घ्यावी लागली. मा. तहसीलदार, जळगाव जामोद यांच्या उपस्थितीत प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झालेल्या बैठकीत लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानुसार डांबरी रस्त्याचे काम दीड महिन्यात पूर्ण करण्यात येईल आणि तोपर्यंत तात्पुरती पर्यायी व्यवस्था म्हणून खडक टाकून कच्चा रस्ता तयार केला जाईल ही मागणी लेखी स्वरूपात मान्य झाल्यानंतर आमरण उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडी आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे, दक्षिण जिल्हाध्यक्ष निलेशभाऊ जाधव, फुले-आंबेडकर विद्वात सभेचे राज्य समन्वयक प्रा.मनोजजी निकाळजे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा विशाखाताई सांवग, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे, भारतीय बौद्ध महासभा महिला जिल्हाध्यक्षा छायाताई बांगर, विद्वात सभेचे जिल्हा समन्वयक प्रा.दिलीप कोकाटे, ॲड.रागिणीताई तायडे, मंगलाताई पारवे, गौतम इंगळे, गिरीश उमाळे, नांदुरा तालुकाध्यक्ष आजाबराव वाघोदे, भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष जगदिश हातेकर, गौतम सुरवाडे, वंचितचे मा.तालुकाध्यक्ष संतोष गवई, बाजार समिती उपसभापती प्रशांत अवसरमोल, रतन नाईक, सुनील बोदडे, देवा दामोदर, विजय सातव, संतोष पवार, राजरत्न वाकोडे, रोशन तायडे, रविंद्र वानखडे, दिलीप दामोदर, विजय दामोदर, प्रशांत नाईक, विकी दामोदर, चेतन तायडे, भास्कर जुबंळे, सुभाष सिरसाठ, सुरेश वाघोदे, मयुर खंडेराव, आदित्य खंडेराव व वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, फुले आंबेडकर विद्वत सभा, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!