बुलढाणा (हॅलो बुलडाणा) प्रसिद्ध चित्रपट ‘नागिण’ 1976 मध्ये झळकला होता. या चित्रपटातील ‘तेरे संग प्यार मैं नही तोडना …!’ या गितावर जितेंद्र आणि रिना रॉय यांनी केलेलं नृत्य आजही अनेकांच्या डोळ्यासमोर उभं राहातं! हुबेहुब असंच दृश्य खालिद बिन वलीद नगर, डॉल्फीन परीसर, शेख रुबिना पोलिस यांच्या घरामागे येथे हे पाहायला मिळालं.
दोन धामण जातीचे साप अगदी एकमेकांमध्ये विळखा घालून मुक्तछंदपणे प्रणयक्रीडा करीत होते. आधी थोडे लांब, मग गवतांचा आड, परत मध्यभागी, नंतर अगदी मुक्तपणे येऊन… असा हा दुर्मिळ विलक्षण प्रणय खेळ अनेकांनी आपल्या डोळ्यात भरला. काही जणांनी कॅमेऱ्यात हे द्दश्य टिपले.मग हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकला. जवळपास 6 फुट लांबीचे हे साप 15 ते 20 मिनटं आपल्या प्रेमलिलेत मग्न होते.