बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शाळेची पहिली घंटा वाजली आणि शाळेत जाण्यासाठी उत्सुक आणि शाळेत जाण्यासाठी त्रास देणाऱ्या बालगोपाळांचा किलबिलाट आज चांगलाच जाणवला.
दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर सोमवारपासून शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली आहे. त्यानुसार, शाळांची पहिली घंटा आज वाजली.असून पुन्हा एकदा शाळा
मुलांच्या किलबिलाटाने गजबजली. शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक,कर्मचाऱ्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशीची तयारी केली असून, तेही
मुलांच्या स्वागतासाठी सज्ज झालेत.जून महिना संपला असून, शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होण्याचे वेध लागले. मामाच्या गावाला सुट्टी साजरी करण्यासाठी गेलेल्या बालगोपाळांना शाळा सुरू होणार म्हटल्यावर परतीच्या प्रवासाची ओढ लागली होती नवीन वर्ग, नवीनशिक्षक आणि नवीन मित्र, नवीन
अभ्यास याची उत्सुकता विद्यार्थ्यांच्या मनात असते.अभ्यासाबरोबर शिक्षक बदलतील का, नवीन शिक्षक कसे असतील, आपले जुने
मित्र असतील का,त्यांनी शाळा तर बदलली
नसेल ना, अशा अनेक प्रश्नांची रसमिसळ डोक्यात घोळत असते. आता या सर्व प्रश्नांची
उत्तरे आज मिळाली.
▪️ शाळा 7 ची की 9 ची ?
दरम्यान, मुलांची पुरेशी झोप व्हावी, म्हणून राज्य सरकारने शाळेच्या वेळा
बदलण्याचा निर्णय घेतला असून सकाळी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या
विद्यार्थ्यांचे वर्ग 7 ऐवजी 9 वाजता सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र,
वर्गखोल्यांची अडचण व व्यवस्थेचा अभाव असलेल्या शाळांनी याबाबत असमर्थता दर्शविली आहे. यासह ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या दोन ते अडीच हजारांपर्यंत आहे, त्यांनी हा निर्णय लागू करण्यास नकार दिला आहे.
कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळांनी यावर संमती दर्शविली आहे.
त्यामुळे काही शाळांची घंटा सकाळी 7 तर काहींची सकाळी 9 वाजता वाजण्याची शक्यता आहे.
▪️ शाळा मध्ये 100% पुस्तके वाटप
पुस्तक वाटप लाभार्थी शाळांची संख्या 2040 आहे. लाभार्थी विद्यार्थ्यांची 236435 एवढी संधी असून पुस्तकांची मागणी 991528 एवढी होती. ही मागणी तालुका स्तरावर शंभर टक्के पूर्ण करण्यात आली.