देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/ संतोष जाधव)मौजे पिंप्रि आंधळे येथील एका विक्रेत्याने निज्यूविड कंपनीच्या प्लॉटचे कपाशीचे बियाणे तब्बल 14 शेतकऱ्यांच्या माथी मारले. लागवडीनंतर हे बियाणे 25 दिवस उलटल्यानंतर विक्रेत्याने कोणतेही कारण न सांगता शेतकऱ्यांना बियाण्यांचे प्लॉट उपटून टाका, असा सल्ला दिल्याने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे.त्यामुळे कंपनीने नुकसान भरपाई करून द्यावी,अशी मागणी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग कायम आहेत.अस्मानी व सुलतानी संकटांना सामोरे जात पदरमोड करून शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि काही शेतकरी अद्यापही पेरणी करीत आहेत.अशात देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील शेतकऱ्यांना संतोष आंधळे रा.पिंप्री आंधळे या विक्रेत्याने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करीत निज्यूविड कंपनीच्या प्लॉटचे कपाशीचे बियाणे लागवडीसाठी दिले.शेतकऱ्यांनी देखील विक्रेत्यावर विश्वास ठेवून शेतात लागवड केली. या लागवडीला 20 ते 25 दिवस पूर्ण झाल्यावर विक्रेता संतोष आंधळे यांनी कुठलेही कारण न सांगता शेतकऱ्यांना प्लॉट उपटून टाकण्याचा सल्ला दिला आहे.लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना 40 ते 50 हजार रुपये खर्च आला असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.त्यामुळे ुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकार्यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनावर विष्णु हरीभाऊ गवई, मनोहर निळोबा खिल्लारे रतन रामकिसन खिल्लारे,भवगान शंकर खिल्लारे, संजय प्रभाकर खिल्लारे,आकाश हरीभाऊ खिल्लारे,रत्नाकर पुंजाजी खिल्लारे, तान्हाजी भिकाजी हिवाळे, प्रल्हाद रायभान जाधव, कैलास प्रकाश शिंगणे, शंकर रुस्तुम शिंगणे,समाधान भिमराव शिंगणे, अरुण जगन्नाथ शेळके,बबन जयाजी खिल्लारे यांची स्वाक्षरी आहे.