spot_img
spot_img

गुन्हेगारांचे कंबरडे मोडणाऱ्या महामुनींना बुलढाणा सोडावा लागणार! कार्यकाळ संपताच बी.बी. महामुनी यांची धडक बदली – रत्नागिरीत होणार रूजू!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रभावी ठसा उमटवणारे अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांची अखेर रत्नागिरी येथे बदली झाली आहे. आज संध्याकाळी शासनाकडून आलेल्या आदेशाने ही बातमी अधिकृत झाली असून, राज्यभरातील वीस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये महामुनी यांचाही समावेश आहे.गेल्या पावणे तीन वर्षांपासून बुलढाण्यात कार्यरत असलेल्या महामुनी यांनी त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी प्रवृत्तीला लगाम घालण्याबरोबरच विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला. जनसंपर्कातून विश्वासार्हता कमावणाऱ्या या अधिकाऱ्याचा जिल्ह्याशी अनोखा भावनिक संबंध निर्माण झाला होता.

महामुनी यांनी 2019 साली उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बुलढाण्यात सेवा दिली. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर 9 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांची पदोन्नती होऊन ते अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले. बुलढाणा जिल्ह्यातील गुन्हेगारी आळा घालणे, विशेष मोहिमा राबवणे आणि जनतेत विश्वास निर्माण करणे, ही त्यांची उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे.मूळचे सांगली जिल्ह्याचे असलेले महामुनी हे आता रत्नागिरी या किनारपट्टी जिल्ह्यात नव्या जबाबदारीसाठी सज्ज होत आहेत. बुलढाण्यासारख्या संवेदनशील जिल्ह्यात काम करून निघालेल्या महामुनींच्या बदलीने जिल्ह्यात पोलीस दलात चांगलीच चर्चा रंगली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!