बुलढाणा (हॅलो बुलडाणा) प्रशासकीय यंत्रणेत ‘लक्ष्मीभेट’ स्वीकारण्याची सवय अंगवळणी पडल्याचे चित्र सर्व दूर आहे. ही खाबुगिरी अलीकडे बुलढाण्यात वाढत असून, अनेकजण कायद्याच्या पळवाटा शोधतात.आज मात्र एसीबीने ट्रॅपमध्ये एका अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले आहे.
16 एप्रिल रोजी सायंकाळी अनिल कुकडे या पोलीस कर्मचाऱ्याने 20 हजार रुपयांची मागणी केली होती तडजोडअंती 15 हजार रुपयात ठरले त्या पैकी 5 हजार रुपयांची लाच कारंजा चौकातील दवे टी स्टॉलवर स्वीकारली आहे.दरम्यान शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांची बदली झाली असता नवीन ठाणेदार राठोड यांना ही सलामी आहे की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.