spot_img
spot_img

💥EXCLUSIVE ‘दादा तुम्ही शब्दांचे धनी!’ – एडवोकेट काझींना विधान परिषदेवर संधी मिळणार का? खामगावात चर्चा रंगली – अजित पवार कोणाचा हात पकडणार?

खामगाव (हॅलो बुलडाणा) “दादा, तुम्ही शब्दांचे खरे अर्थाने धनी आहात!” अशी भावनिक साद बुलडाणा जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना घालण्यात आली आहे. निमित्त आहे, बुलडाण्याचे ज्येष्ठ, निष्ठावान व अनुभवी नेते अ‍ॅड. नाझेर काझी यांना विधान परिषदेवर संधी मिळावी, यासाठीचा जोरदार पाठिंबा!

आज खामगाव येथे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. या कार्यक्रमाला खुद्द अजित पवार उपस्थित राहणार असल्याने खामगावचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जिल्ह्याच्या दोन दिग्गज नेत्यांपैकी कोणाची वर्णी विधान परिषदेसाठी लागणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.एकीकडे, अ‍ॅड. नाझेर काझी – ज्यांनी वर्षानुवर्षे पक्षासाठी निष्ठेने काम केले, सामान्य कार्यकर्त्यांशी नाळ जोडून ठेवल्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार मागणी होत आहे. दुसरीकडे, नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश करणारे दिलीप सानंदा यांचेही नाव चर्चेत आहे. विधान परिषदेवर जाण्यासाठी त्यांनीही रस दाखवल्याचे बोलले जात आहे.

पक्षनिष्ठा, अनुभव आणि समाजाशी असलेला संपर्क लक्षात घेता अ‍ॅड. काझी यांना संधी द्यावी, अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. “दादा, जुने कार्यकर्तेच पक्षाचे खरे खांब आहेत,” असे म्हणत कार्यकर्ते अजितदादांना भावनिक आवाहन करत आहेत.अजित पवार कोणता निर्णय घेतात? जुने वफादार काझी की नव्याने आलेले सानंदा? की या दोघांपैकी कोणालाही संधी न देता काही वेगळाच डाव? याचे उत्तर काही तासांत स्पष्ट होणार आहे. पण तोपर्यंत सोशल मीडियावर ‘काझींना हक्काचे स्थान मिळावे!’ ही मोहिम जोरात सुरू आहे!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!