बुलढाणा (हॅलो बुलडाणा) गृहखात्याच्या अजब कारभारामुळे सध्या बुलढाणा जिल्ह्याला दोन पोलिस अधीक्षक आहेत. बदली झालेले विश्व पानसरे व नविन नियुक्त करण्यात आलेले निलेश तांबे! कोण खरे एसपी हे कॅट च्या 12 जूनच्या सुणावणीनंतर कळणार आहे. अशातच शिक्षण विभागात देखील प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांचा पदभार काढला आणि त्यांच्या जागी जळगाव खान्देशच्या विकास पाटील यांनी काल पदभार स्विकारला आहे. विशेष म्हणजे बाळासाहेब खरात यांची बदली करण्यात आली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे दोन एसपीं सारखे जि.प. मध्ये दोन प्राथमिक शिक्षणाधिकारी असल्याचे दिसून येत आहे.
माहिती नुसार, बाळासाहेब खरात यांच्या कार्यप्रणालीवर अनेकदा प्रश्चचिन्ह उठले आहे. विशेष म्हणजे बोगस दिव्यांग शिक्षक प्रकरणी ‘हॅलो बुलढाणा’ ने अनेक वेळा पाठपुरावा करून प्राथमिक शिक्षण अधिकारी खरात यांची अनास्था अधोरेखीत केली होती. दरम्यान आता त्यांचा पदभार काढून विकास पाटील यांना देण्यात आला आहे.तर खरात यांनी हा पदभार दिला असून त्यांची बदली झाली नसल्याची खबर आहे.
नवीन शिक्षणअधिकाऱ्यांची या पूर्वीची माहिती…
शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांचे निकटवर्तीय असलेल्या बुलढाण्याचे नवीन शिक्षणाधिकारी विकास पाटील हे राज्यातील प्रशासकीय सेवेत अनुभवसंपन्न अधिकारी म्हणून ओळखले जातात. शिक्षण क्षेत्रातील विविध पदांवर काम करत असताना त्यांनी प्रशासन, शिस्त आणि गुणवत्तेवर भर दिला आहे.