spot_img
spot_img

💥इम्पॅक्ट! ‘हॅलो बुलडाणा’ चा दणका! – वृत उमटताच वर्ग खोलीच्या ले-आउट साठी अभियंत्यांची धाव! – डोणगावातील शाळेचा झाडाखाली भरत होता वर्ग! पण 12 दिवसात वर्ग खोल्या पूर्ण होणार का?

डोणगाव (हॅलो बुलडाणा/अनिल राठोड) ‘डोणगाव शाळेचा वर्ग झाडाखाली!शिक्षणासाठी ही का शिक्षा?’ या मथळ्याखाली ‘हॅलो बुलढाणा’ ने वृत्त प्रसारीत करताच शिक्षण विभाग जागी झाला असून वर्गखोली चे लेआउट टाकण्यासाठी अभियंता देखील सरसावले आहे.परंतु प्रवेशोत्सवाला अवघे बारा दिवस शिल्लक असताना वर्गखोल्या कशा पूर्ण होणार? असा सवाल पालकांना पडला आहे.

मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा मधे 11 तुकड्या असून 8 वर्ग खोल्या आहेत. त्याला पाहता 3 वर्ग खोल्या नसल्याने मुलांना खुल्या जागेत बसून शिक्षण घ्यावे लागत असे. दरम्यान एका पालकाने आंदोलनात्मक पवित्र घेत पावसाळ्यामध्ये वाटरप्रूफ टेन्टची मागणी करताच शिक्षण विभागाने त्या वर्ग खोल्या मंजूर असून एका वर्ग खोलीचे बांधकाम साठी ले आउट टाकले आहे. या संदर्भात ‘हॅलो बुलढाणा’ने विशेष प्रकाश झोत टाकला होता.असे असले तरी, प्रवेश उत्सवाला 12 दिवस शिल्लक असतांना वर्ग खोल्या कश्या होणार? हा प्रश्न उभा झाला आहे.

डोणगावच्या जिल्हा परिषद उर्दू शाळांमध्ये 347 विध्यार्थी असून येथे 11 तुकड्या व तीन वर्ग खोल्या कमी आहेत. त्यामुळे 15 फेब्रुवारी 2024 रोजी पालकांनी आंदोलन केल्या नंतर शिक्षण विभागाने 20 सप्टेंबर 2024 रोजी वर्ग खोली बांधकाम साठी मंजुरात दिली होती. मंजुरात मिळून देखील बांधकाम करण्यात आलेले नसल्याने विध्यार्थ्यांना खुल्या जागेत झाडा खाली बसून शिक्षण घ्यावे लागत असे. दरम्यान पालकांनी आंदोलक पवित्रा घेत वर्ग खोल्या नको पावसाळ्या मध्ये शिक्षण घेण्यासाठी वॉटर प्रूफ टेन्ट देण्याची मागणी केली. याबाबतची सडेतोड बातमी प्रकाशित होताच झोपलेले शिक्षण विभाग जागे झाले व एका वर्ग खोलीच्या बांधकामाचे ले आउट टाकण्या साठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता निलेश दहातोंडे, जिल्हा परिषद बांधकाम विभाग अभियंता शुभम वायाळ यांना वर्ग खोलीचे बांधकाम सुरु करण्यासाठी पाठविले. मात्र प्रवेशोत्सवाला12 दिवस शिल्लक असताना वर्ग खोल्या आता तरी होणार काय?असा प्रश्न निर्माण होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!