डोणगाव (हॅलो बुलडाणा) समृद्धी महामार्ग लगत समृद्धीच्या बचाव साठी टाकण्यात आलेला भराव गौण खनिज माफिया उत्खनन करून घेऊन जात असून,समृद्धी महामार्गाला मोठा धोका निर्माण होत आहे.या प्रकरणी कारवाई होत नसल्याने हा चिंतेचा विषय बनलाय!
डोणगाव समृद्धी महामार्ग हा राज्यासाठी भरभराटीचा व औद्योगिक क्रांती घेऊन येणारा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून गणल्या जातो. या महामार्गाची ख्याती देशभरात पोचलेली असून कित्येक हौशी पर्यटक, व्यावसायिक, मालवाहू वाहतूक या एक्सप्रेस वे वरून प्रवास करीत आहेत मात्र या महामार्गाला कुडताडणाऱ्या अवैध गौण खनिज माफियाची वक्रदूष्टी सध्या समृद्धी महामार्गा साठी धोकादायक ठरत आहे.त्यामूळे समृद्धी महामार्गाला येत्या काही वर्षात मोठया नुकसानीस सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान याप्रकरणी कोणताही विभाग काहीही करायला तयार नसल्याने सध्या गौण खनिज माफियांनी पुन्हा चोरी करण्यासाठी सुरवात केली. डोणगाव पासून जवळच महाराष्ट्रातला ड्रीम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्ग जातो त्याने गावाला एक वेगळी ओळख मिळाली गाव समृद्धी महामार्गावर आले मात्र सध्या वेगळ्याच कारणाने समृद्धी महामार्ग गाजत आहे. येथून जाणाऱ्या चॅनेल नंबर 268,269 वरती समृद्धी लगत अवैध उत्खनन होत असल्यामुळे माध्यमात वृत्त प्रसारित होताच हजारो ब्रास मुरूम चोरी झाल्या नंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ चे कार्यकारी अभियंता महादेव अकोडे यांनी फक्त 100 ब्रास मुरूम चोरी झाल्याची कैफियत डोणगाव पोलीस स्टेशनला दिली त्या नंतर ड्रोन द्वारे सर्वे करण्यात आला. त्यात समृद्धी महामार्गावर खुश्किचे मार्ग, तुटलेले कंपाउंड याची पाहणी केली मात्र दोन महिन्यात कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही, चोर पकडल्या गेलेले नाही, तुटलेली सुरक्षा भिंत जशीच्या तशीच राहिली त्यामुळे चोरटे सक्रिय आहेत.त्यांनी समृद्धी लगत पुन्हा उत्खनन सुरु केल्याने यावर वेळीच आवर घातला नाहीतर पुढे मोठा धोका संभावू शकतो. शेलगाव देशमुख रोडने समृद्धी च्या पुलाजवळ चॅनल न. २६७ जवळ मुरुम खोदून नेण्यात येत असताना प्रशासन कारवाई च्या नावाखाली टोलवाटोलवी करीत असल्याने समृद्धी महामार्ग धोक्यात आला आहे. ( समृद्धी महामार्ग लगत हजारो ब्रास मुरूम उत्खनन होऊन देखील मागील दोन महिन्यात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्याला पाहता गौण खनिज माफियानी पुन्हा समृद्धी महामार्ग पोखरणे सुरु केले. यात विशेष म्हणजे समृद्धी वरून मुरूम चोरून नेण्यासाठी वापरला जाणारा मार्ग सुद्धा जसाच्या तसाच शाबूत असल्यामुळे चोरट्यानी पुन्हा आपली नजर समृद्धी महामार्ग कडे वळवली आहे.