खामगाव (हॅलो बुलडाणा) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी नुकताच काँग्रेसला रामराम ठोकत पक्षातून एक्झिट घेतली. त्यांच्याच राजकीय अस्तित्वाला जोरदार धक्का देत, काँग्रेसने आता नव्या दमाच्या नेतृत्वाची तयारी केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून ज्ञानेश्वर पुरुषोत्तम पाटील यांची खामगाव विधानसभा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.सानंदा यांच्या जाण्यानंतर रिक्त झालेल्या पदावर लगेचच पाटील यांची वर्णी लागल्याने काँग्रेसने स्पष्ट संकेत दिले आहेत—पक्ष आता नव्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार आहे. विशेष म्हणजे, सानंदा यांचे जुने विरोधक समजले जाणारे तेजेंद्रसिंह चौहान हे देखील आता प्रदेशाध्यक्षांच्या जवळ आले आहेत. मुंबईत सपकाळ व चौहान यांच्यात विशेष चर्चा झाल्याची माहिती गुप्त सूत्रांकडून समोर आली आहे.
यामुळे आता खामगाव काँग्रेसचा ताबा ज्ञानेश्वर पाटील आणि तेजेंद्रसिंह चौहान यांच्या जोडीकडे जाण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. स्थानिक राजकारणात यामुळे मोठे बदल अपेक्षित असून सानंदा यांच्या गटाला स्पष्ट झटका बसला आहे. खामगाव विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची दिशा आणि दशा ठरवणारे निर्णय आता या नव्या समन्वयक जोडीकडूनच घेतले जाणार, हे नक्की!
अशी आहे नवीन शेगाव/खामगाव काँग्रेस कमिटी
▪️ शेगाव शहर काँग्रेस अध्यक्षपदी कैलास देशमुख यांची नियुक्ती
▪️ शेगाव ग्रामीण काँग्रेस अध्यक्षपदी ज्ञानेश्वर शेजोळे यांची निवड
▪️ खामगाव तालुका काँग्रेस अध्यक्षपदी तेजेंद्रसिंह चौहान यांची नियुक्ती
▪️ खामगाव शहर काँग्रेस अध्यक्षपदी स्वप्नील ठाकरे पाटील यांची निवड