बुलढाणा (हॅलो बुलडाणा) भाजपच्या संघटनात्मक बांधणीस नवे बळ देत मंदार बाहेकर यांची बुलढाणा शहराध्यक्षपदी तर सतीश पाटील यांची बुलढाणा तालुका ग्रामीण अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही दोन्ही निवडी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या ठाम नेतृत्वाखाली पार पडल्या असून, या निवडींमुळे कार्यकर्त्यांत उत्साहाची लाट उसळली आहे.मंदार बाहेकर हे शहरातील अभ्यासू, तरुण आणि जोशपूर्ण नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वीही संघटनेत विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. दुसरीकडे, सतीश पाटील हे ग्रामीण भागात सक्रिय आणि जनतेच्या प्रश्नांवर नेहमी आक्रमक भूमिका घेणारे नेते आहेत.
या दोन्ही निवडींमुळे भाजपने शहर आणि ग्रामीण भागात सशक्त नेतृत्व दिले असून आगामी स्थानिक निवडणुकांसाठी भाजप आक्रमक पवित्रा घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विजयराज शिंदे यांच्या संघटनात्मक कौशल्यातून भाजप जिल्ह्यात अधिक बळकट होत असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
अशे आहेत जिल्ह्यातील भाजपाचे पाच पदाधिकारी नियुक्त..
▪️ बुलढाणा शहराध्यक्ष: मंदार बाहेकर
▪️ बुलढाणा तालुकाध्यक्ष: सतीश पाटील
▪️ मोताळा तालुका व शहर अध्यक्ष : सचिन शेळके
▪️ धामणगाव बढे ग्रामीण अध्यक्ष: सागर पाटील
▪️ मेहकर ग्रामीण अध्यक्ष: सारंग माळी