बुलढाणा (हॅलो बुलडाणा) पर्यावरण आणि अध्यात्माचा मनोहारी प्रवास घडवून आणण्यासाठी बुलढाणा सायकलिंग क्लब बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने ‘बुलढाणा ते पंढरपूर सायकल वारीचे’ आयोजन करण्यात आले आहे.18 ते 21 जून दरम्यान ही वारी संपन्न होईल तर 22 जून रोजी सायकल रिंगण सोहळा रंगणार आहे.
सायकलवारीच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न राहील. सायकलने पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची यात्रा हा वेगळा अनुभव आहे.या प्रवासात निसर्गाचा जवळून अनुभव घेता येईल ज्यामुळे आनंद आणि शांती प्राप्त होणार आहे. इच्छूक सायकलपटूंनी या सायकलवारीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी दीपक क्यावल 9823436505,संजय टाके 9822226777,
सरदार सिंग ठाकूर 9823184558,
नंदकुमार उमाळे 9423145169 यांचेशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले.