spot_img
spot_img

मोताळा तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिलला सोडत!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार मोताळा तालुक्यातील 65 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण निश्चित करायचे आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 30 अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार सन 2025 ते 2030 दरम्यान मोताळा तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण दि. 16 एप्रिल 2025 रोजी तहसिल कार्यालय, मोताळा येथे निश्चित करणार आहे.

तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गा अंतर्गत स्त्रीकरीता आरक्षण सोडत दि. 25 एप्रिल 2025 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता सूरु होणार असून उपविभाग मलकापुर अंतर्गत मोताळा तालुक्याचे स्त्रीकरीता आरक्षण सोडत दुपारी 2.00 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे निश्चीत करण्यात येणार आहे. सदर आरक्षण सोडतीकरीता मोताळा तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मोताळा तहसिलदार हेंमत पाटील यांनी कळविले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!