बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ऑन ड्युटी 24 तास असलेले पोलीस आणि त्यांचे कुटुंब गेल्या दोन दिवसापासून ‘महावितरण’ दुर्लक्ष करीत असल्याने अंधारात चाचपडताहेत. एसपी कार्यालयालगत असलेल्या पोलीस क्वार्टरमध्ये नवे एसपी निलेश तांबे देखील या प्रश्नाकडे दुर्लक्षित दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली तर याचे दुष्परिणाम कायदा व सुव्यवस्थेवर दिसून येण्याची शक्यता आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालया लगत पोलीस कॉर्टर आहे.येथे गेल्या दोन दिवसापासून केबल जळाल्याने वीज पुरवठा खंडित झाला. महावितरण अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना फोन केला तर ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोर्टात चेंडू पेलावतात.केबलचे काम अंडरग्राउंड असल्याने त्यांचे म्हणणे योग्यही असू शकते.परंतु बिल घेण्यास महावितरणचे कर्मचारी महिन्याकाठी हजर होतात. त्यामुळे पैसे घेता आणि सोयी सुविधा उपलब्ध का करून देत नाहीत असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.शिवाय पोलीस कर्मचाऱ्यांच्या पगारातून दर महिन्याला पाचशे रुपये सोयी सुविधा साठी घेण्यात येतात.या पैशांचे काय होते?हा देखील एक प्रश्नच आहे.’हॅलो बुलढाणा’ ने यासंदर्भात महावितरण च्या अकोला,वाशिम, बुलढाणा येथील जनसंपर्क अधिकारी यांना संपर्क केला असता, सदर समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.