बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील मलकापूर रोडवरील राजदरबार हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या एका तरुणावर चौघा हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना काल रात्री 9.30 वाजता घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी जगदीश शाम पाठक (वय 31, रा. पाठक गल्ली, बुलढाणा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवन सुरडकर याने त्याच्या डोक्यात खुर्चीने मारले, विशाल गायकवाड याने बियरची बाटली फोडली, तर रूपेश सोनुने याने चाकूने पाठीवर व डाव्या मांडीवर वार केला. चौथा आरोपी, ज्याचे संपूर्ण नाव माहित नाही, याने कपाळावर, पाठीवर व डाव्या हातावर वस्त्राने बेदम मारहाण केली.
हल्ला इतका गंभीर होता की फिर्यादीसोबत असलेल्या नातेवाईकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही शिवीगाळ करत लोटपाट करण्यात आले. ही संपूर्ण घटना व्यवसायातील वैमनस्यातून घडल्याचा संशय असून, फिर्यादीने हे हल्लेखोर आपल्याला ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचे स्पष्ट केले आहे.या प्रकरणी भारतीय नवसंहिता (BNS) कलम 109(1), 115(2), 352, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.