बुलढाणा (हॅलो बुलडाणा) माजी आमदार विजयराज शिंदे यांना आमदार करणे ही माझ्या वैयक्तिक व राजकीय आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचे वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये केले आहे.आमदार संजय गायकवाड व माजी आमदार विजयराज शिंदे यांचे राजकीय वैर सर्वश्रूत आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याची दोघेही संधी सोडत नाहीत.नुकतीच आमदार संजय गायकवाड यांची एका वृत्तवाहिनीने मुलाखत घेतली.या मुलाखतीमध्ये तुमच्या राजकीय किंवा वैयक्तिक आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती असा त्यांना प्रश्न विचारण्यात आला.
दरम्यान विजयराज शिंदे यांना आमदार करणे माजी सर्वात मोठी चूक असल्याचे गायकवाड म्हणाले.शिंदे हे गुरव समाजाचे होते.त्यावेळी मराठा समाजाला तिकीट द्यायचे होते.परंतु बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जात शिकवली नाही.त्यामुळे आम्ही शिंदे यांना तिकीट द्यायला लावली.पुढे मात्र पक्षात कोणी मोठे होऊ नये म्हणून शिंदे यांनी सहा महिन्यातच माझा सफाई करणे सुरू केले.त्यांना कुणी प्रतिस्पर्धी पाहिजे नव्हता.म्हणून मला तडीपार करणे एमपीडीए कारवाई करणे माझ्या 94 वर्षाच्या आईवर 307 चा गुन्हा दाखल करणे, पत्नीवर ॲट्रॉसिटी दाखल करणे, अल्पवयीन मुलावर गुन्हे दाखल करणे असा उद्योग विजयराज शिंदे यांनी त्यावेळी केला.त्यांना मी कुठेच नको होतो,असा खळबळजनक आरोप गायकवाड यांनी केला. पुढे ते म्हणाले की मी ज्या पक्षात गेलो त्या पक्षातील कार्यकर्त्यांना खरेदी करण्याचे काम शिंदे यांनी केले आहे.मी मात्र पक्षात अनेक लोकांना घेतो कोणी जड जाईल याची मला पर्वा नाही.जर ज्या दिवशी लोकांच्या कामाच्या लायकीचा राहिलो नाही त्यादिवशी लोक मला आपोआप घरी बसवतील असेही मत गायकवाड यांनी या मुलाखतीत व्यक्त केले.