spot_img
spot_img

💥खूर्चीला सिंदूर,हार अन् आरती! ‘दांडीबाज’ जलसंधारण अधिकारी अमोल मुंडे हरविल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठले! – शिवसैनिक व शेतकऱ्यांचा अभिनव निषेध!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मुंडे हे सतत गैरहजर असल्याची चर्चा नेहमीच असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने, शिवसैनिक व शेतकऱ्यांनी मुंडे यांच्या कार्यालयातील रिकाम्या खुर्चीला कुंकू लावून हार घालून व आरती ओवाळून निषेधात्मक सत्कार केला. त्यानंतर जलसंधारण अधिकारी अमोल मुंडे हरविले की त्यांचे कोणी अपहरण केले? याबाबत तक्रार देण्यासाठी त्यांनी शहर पोलीस स्टेशन गाठल्याचा प्रकार ३१ मे रोजी समोर आला आहे.

झाले असे की,जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने मोहगंगा व नळगंगा नदीवरील निकृष्ट बॉक्स कल्व्हर्ट मुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.या नुकसानीचा शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध करत नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी वारंवार केली. मात्र प्रतिसाद मिळाला नाही.मोहगंगा व नळगंगा नदीपात्रातील रस्त्यांवर बांधलेल्या बॉक्स कल्व्हर्टच्या खराब दर्जामुळे दरवर्षी च्या पावसाळ्यात रस्ता वाहून जातो. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने ३७५ ते ३८५ एकर शेती असलेल्या शेतकऱ्यांचा काढणीला आलेला माल पावसामुळे शेतात सडला, तर काहींच्या पिकांचे पुरात पूर्ण नुकसान झाले. लाखो रुपयांचे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले. शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून ठोस कार्यवाही करण्यात यावी, झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, आणि संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली होती. शिवसैनिकांची व शेतकऱ्यांच्या इशाऱ्याची दखल जिल्हाधिकारी कार्यालयाने घेत पोलिस अधीक्षकांमार्फत मलकापूर ग्रामीण ठाणेदार संदीपजी काळे यांना स्थळ निरीक्षण करण्याकरिता पाठविले होते.

तरीही साखर झोपेत असलेले जिल्हा जलसंधारण अधिकारी यांना जागे करण्याकरता ३० मे रोजी मलकापूर तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील यांनी दाताळा, शिराढोण, निंबारी येथील शेतकऱ्यांसह जिल्हा जलसंधारण कार्यालय गाठले. नेहमी प्रमाणे ३१ रोजी देखील मुंडे आपल्या खुर्चीत हजर नव्हते, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी महाशयांच्या खाली खुर्चीची आरती ओवाळली व बुलढाणा शहर पोलीस स्टेशन गाठले व चिंतीत अवस्थेत साहेब कुठे हरवलेत का किंवा त्यांचे कोणी अपहरण केले की काय ? याबाबत तक्रार दाखल करण्यास गेले. विषयाचे गांभीर्य लक्षात घेता कर्तव्यदक्ष ठाणेदार रवी राठोड यांनी पुढील २४ तासात महाशयांना शोधण्याचे ठोस आश्वासन दिले व तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील यांच्यासह कास्तकार व शिवसैनिकांना शांत केले. यावेळी सुरेश बऱ्हाटे, राजेंद्र काजळे, गणेश सुशीर, पांडुरंग बऱ्हाटे, परशूराम बऱ्हाटे, ओंकार बऱ्हाटे, गोपाळ पाटील, सुनील विखारे, अजय विखारे, गणेश सुशीर, सतीश शेळके, प्रफुल वराडे, आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

▪️शिवसेना तालुकाप्रमुख दिपक चांभारे म्हणाले..

‘पावसाळा सुरू होण्याच्या आधी शेतकऱ्यांसाठी जाण्याकरिता लागणारा ठोस रस्ता न झाल्यास कास्तकारांच्या व शिवसैनिकांच्या भावनांचा अंत होणार व त्यातून उद्भवणाऱ्या उद्रेकास बुलढाणा जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मुंडे हे जबाबदार राहतील.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!