spot_img
spot_img

सिंदखेडराजा येथे स्वामी सेवेकऱ्यांची स्वच्छता मोहिम – ‘महासत्संगानंतर’ सामाजिक जबाबदारीचे उदाहरण!

सिंदखेडराजा (हॅलो बुलडाणा/सुरेश हुसे)  शहरात दिनांक २० मे २०२५ रोजी पार पडलेल्या “जागर स्त्रीशक्तीचा आणि गजर राष्ट्रभक्तीचा” या भव्य राष्ट्रीय महासत्संगानंतर परिसरात निर्माण झालेला कचरा आणि अस्वच्छतेचा प्रश्न स्वामी सेवेकऱ्यांनी पुढाकार घेत स्वखुशीने मार्गी लावला. ३१ मे रोजी शहरातील सेवेकऱ्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून कार्यक्रमस्थळी स्वच्छता मोहीम राबवली.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालविकास मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी नगराध्यक्ष विष्णू मेहेत्रे यांच्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या या महासत्संगात हजारो भाविकांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असला, तरी त्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा व घाण निर्माण झाली होती.या पार्श्वभूमीवर, समाजासाठी नेहमी तत्पर असलेल्या स्वामी सेवेकऱ्यांनी ३१ मे रोजी सकाळपासूनच शेतात जाऊन संपूर्ण परिसराची साफसफाई केली. या मोहिमेत माता-भगिनी, बालगोपाल आणि इतर सेवेकरी देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. हातात फावडे, झाडू आणि टोपल्या घेऊन स्वच्छतेचा संदेश देत त्यांनी परिसर स्वच्छ केला.

स्वामी समर्थ मार्गाचा मूलभूत संदेश म्हणजे “सेवा हीच खरी साधना”. या उपक्रमातून सेवेकऱ्यांनी हेच अधोरेखित केले. या सामाजिक उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. स्वच्छता मोहिमेमुळे भाविकांच्या मनात एक सकारात्मक छाप निर्माण झाली असून, इतर संस्थांसाठीही हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!