सिंदखेडराजा (हॅलो बुलडाणा/सुरेश हुसे) बुलढाणा जिल्ह्याच्या प्रशासनाला नवा चेहरा आणि नवी ऊर्जा मिळाली आहे! जनतेच्या हक्कासाठी सातत्याने लढणारे, कर्मचाऱ्यांचे हित जपणारे, आणि समाजसेवेत अखंड निष्ठा ठेवणारे प्रविण भाऊ गीते यांची प्रशासन अधिकारी म्हणून पदोन्नती झाल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. सामान्य जनतेचा विश्वास आणि सहकाऱ्यांचा सन्मान मिळवलेले गीते आता अधिकृतपणे प्रशासनात नेतृत्वाची भूमिका बजावणार आहेत.गीते यांचा प्रवास हा केवळ नोकरीतील यशाचा नव्हे, तर सामाजिक बांधिलकीचा आदर्श आहे. जिल्हा कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय, पारदर्शक कारभार आणि संवादात्मक नेतृत्व हे आजही चर्चेचा विषय आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेने आर्थिक क्षेत्रात नवा आयाम गाठला.
साहित्य, प्रशासन आणि समाजकार्याचा त्रिवेणी संगम असलेल्या गीते यांना ‘चालतं-बोलतं विद्यापीठ’ असं संबोधलं जातं. त्यांच्या लेखणीतून उमटणारी सामाजिक जाणीव, व्याख्यानांतून व्यक्त होणारा विवेक आणि व्यवहार्य धोरणे ही त्यांची खरी ताकद आहे.सिंदखेडराजा पंचायत समितीत कार्यरत असताना हजारो नागरिकांच्या समस्या त्यांनी आपल्या कार्यकौशल्याने सोडवल्या. “कोणीही रिकाम्या हाताने परत गेलेला नाही,” हे स्थानिकांचे उद्गार त्यांच्या कार्याचा ठसा अधोरेखित करतात.