spot_img
spot_img

संतोष दराडेंच्या संघर्षाला यश; तहसीलदार व ग्राम अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर दुसऱ्या दिवशी उपोषण मागे!

सिंदखेडराजा (हॅलो बुलडाणा/सुरेश हुसे)  सिंदखेडराजा तालुक्यातील अवैध रेती उत्खननाविरोधात हिवरखेड पूर्णा येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष अंबादास दराडे यांनी खडकपूर्णा नदीपात्रात सुरू केलेल्या बेमुदत आमरण उपोषणाला प्रशासनाच्या प्रत्यक्ष हस्तक्षेपामुळे यशस्वी सांगता मिळाली आहे. आज ३० मे रोजी तहसीलदार अजित दिवटे, पोलीस ठाणेदार विनोद नरवाडे आणि महसूल विभागाचे अधिकारी उपोषण स्थळी येऊन थेट तपासणी व संवाद साधून प्रशासनाकडून तत्पर कारवाईचा आश्वासन दिले.

दराडेंनी उपोषण सुरू असताना तालुक्यातील अवैध रेती उत्खननाचे तथ्य अधोरेखित करत पुढील मागण्या मांडल्या होत्या — अवैध उत्खननाचा अधिकृत मोजमाप आणि अहवाल, हिवरखेड रेती घाटाच्या परवानग्यांचे तपशील व CCTV फुटेजची उपलब्धता, तहसीलदारांच्या संमतीने सुरू असलेल्या कंत्राटाची चौकशी, तसेच रेती साठ्याचा अधिकृत अहवाल सादर करणे. प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने तपासणी व कठोर कारवाईची लेखी व तोंडी खात्री दिल्याने दराडे यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.या आंदोलनामुळे सिंदखेडराजा तालुक्यातील अवैध रेती उत्खननाचा विषय पुन्हा एकदा प्रशासनाच्या लक्षात आला असून, स्थानिक लोकशाही आणि जबाबदार सामाजिक कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेतली गेली आहे. दराडे यांचे हे आंदोलन प्रशासनाला जागे करण्याचे आणि स्थानिक समस्या सोडवण्याचे यशस्वी उदाहरण म्हणून पुढे आले आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील रहिवासी या कारवाईची अपेक्षा करत असून, या विषयावर प्रशासनाने कठोर पावले उचलल्याशिवाय परत यशस्वी उपोषणाची शक्यता वर्तवली जात आहे

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!