बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलडाणा तालुक्यातील घाटनांद्रा गावाजवळील एका आश्रमात चपटा – बुक्क्यांचा मार देऊन दारू सोडविण्याचा उपचार केल्या जात असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. याबाबत ‘हॅलो बुलढाणा’ ने सडेतोड वृत्त प्रकाशित केले होते. ‘ढोंगी बाबा तेथेच दाबा’ असे आव्हान करण्यात आले होते. दरम्यान या बातमीची दखल घेऊन ढोंगी बाबा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
29 जून रोजी सोशल मिडीयावर प्रसारीत झालेल्या माराहाणीच्या व्हिडीओ प्रकरणी शिवाजी बरडे उर्फ शिवा महाराज यांचे विरूध्द पोस्टे रायपुर येथे मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मिडीयावर घाटनांद्रा येथील महाराज हे एका व्यक्तीला मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ प्रसारित झालेला होता सदर
व्हिडिओच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेवुन माहिती घेणेबाबत रायपुर ठाणेदार यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार रायपुर ठाणेदार यांनी प्रकरणाची तात्काळ माहिती घेवुन सदर प्रकरणातील पिडीत व्यक्तीचा शोध घेण्यात
आला व त्यानुसार सदर व्यक्ती नामे राजेश श्रीराम राठोड वय 36 वर्षे रा.
माळेगांव ता मंठा जि जालना हे 29 जून रोजी पोलीस स्टेशनला आल्याने व घडलेल्या प्रकरणाबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,
ग्राम घाटनांद्रा शिवारात राहत असलेल्या शिवाजी पुंडलिक बरडे उर्फ शिवा
महाराज याचे विरूध्द पोलीस स्टेशन रायपुर येथे फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी उपविभागीय पोलीस
अधिकारी सुधीर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली
ठाणेदार दुर्गेश राजपूत हे सदर प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.