spot_img
spot_img

💥BREAKING ‘भाईगिरी!’ आमदारांना का शुभेच्छा दिल्या नाहीत? गां..गोळ्या घालणार! – निवांत हॉटेलवर रात्री एकाला धमकी,गुन्हा दाखल!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) पैशाच्या व्यवहारावरून वाद झाला आणि आमदारांना का शुभेच्छा दिल्या नाहीत? म्हणून गां..गोळ्या घालणार अशी धमकी एकाने 29 मे च्या रात्री अकरा वाजून 45 वाजता हॉटेल निवांत वर दिली.यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत नंदू जगन्नाथ लवंगे रा.देऊळघाट यांनी आरोपी देवानंद दांडगे रा.सागवन विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बुलढाणा शहरात गुन्हेगारी वाढत आहे.आमदाराच्या नावाने कुणी काही पण पाऊल उचलत असल्याने नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना आता विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. कारण काल उशिरा रात्रीच्या प्रकरणावरून बुलढाण्यात खळबळ उडाली आहे.पोलिसांच्या माहिती प्रमाणे,फिर्यादी नंदू जगन्नाथ लवंगे हे शेतकरी 29 मे रोजी अकरा वाजून 45 वाजता हॉटेल निवांत वर प्रमोद टेकाळे यांनी फोन केला असता ते जेवणासाठी गेले होते.त्यांच्यासोबत त्यांचा ड्रायव्हर जमीर मिर्झा सुद्धा होता.जेवण सुरू असताना जमीर मिर्झाचे व देवानंद दांडगे यांचे पैशाच्या व्यवहारावरून वाद झाले.या वादात फिर्यादी नंदू लवंगे यांना सुद्धा टारगेट करण्यात आले. त्यांना अश्लिल शिवीगाळ करत तुला माज आला का? तू आमदारांना का शुभेच्छा दिल्या नाही?असे धमकावत सहाच्या सहाही गोळ्या गां..टाकून देईल,अशी ही धमकी आरोपीने दिली.कॉलर धरून माझे आधीचे प्रकार माहित नाही का? मी किती जणाला मारले आहे? याची तुला माहिती नाही का?असे म्हणत तुझा कार्यक्रम आताच लावू शकतो.माझ्याकडे पंधरा लोक आहेत तुझ्यासोबत कोण आहे? तुला ज्यांनी जेवणासाठी बोलावले ते माझ्या जातीची आहे.मी तुला जीवाने मारू शकतो अशी धमकी देत वाद घातला असल्याने हॉटेल मालक संतोष पाटील यांनी यामध्ये हस्तक्षेप करून आरोपीच्या तावडीतून वाचविले असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.शिवाय आरोपीने पुढील धमकीत म्हटले की,तुझ्यासारखे चार-पाच जरी मारले तरी आम्हाला काही फरक पडत नाही.तुझ्यावरती यापूर्वी जो हमला झाला तो आम्हीच केला.यापुढे तुला जिवंत ठेवणार नाही अशीही धमकी दिली असताना फिर्यादीचे मित्र प्रमोद टेकाळे, संतोष पाटील यावेळी हजर होते.आरोपीवर नव्या एसपींनी कठोर कारवाई करावी अशी मागणी फिर्यादी यांनी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कलम 296 115 351(2),(3) बीएनएस नुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!