बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राज्य सरकारने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करत विविध जिल्ह्यातील प्रशासनात नवे चेहरे नियुक्त केले आहेत.बुलढाणा जिल्ह्याला देखील एसपी निलेश तांबे यांच्या स्वरूपात नवा चेहरा मिळाला. तर आज 27 मे रोजी जिल्ह्यातील 4 पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे.
सध्या प्रशासकीय बदल्यांचा मौसम सुरू असून महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांनी जोरदार बिल्डिंग लावल्याचे राज्यात चित्र आहे. त्यामुळे बदल्यांचा पोळा फुटून पोलीस प्रशासनात नव्या जबाबदाऱ्यांसह बदलाचे वारे वाहू लागले आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील 4 पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली. येथील पोलीस निरीक्षक ब्रह्मदेव शेळके यांची जळगाव, माधवराव गरुड यांची लाप्रवि तर सारंगधर नवलकर यांची नंदुरबार तसेच विलास पाटील यांची वर्धा येथे बदली करण्यात आली आहे.