spot_img
spot_img

योजनेतून शिलाई मशीनसाठी २५०० रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर प्रकार; एसीबीने केली कारवाई!

चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) पंचायत समिती चिखली येथे शासकीय योजनेतून शिलाई मशीन मिळवण्यासाठी २५०० रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी एसीबीची ताबडतोब कारवाई झाली आहे. आरोपी कनिष्ठ सहाय्यक हेमंत राजपूत याने समाज कल्याण विभागाच्या योजनेतुन लाभार्थींना शिलाई मशीन मिळवण्यासाठी लाच मागितल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणाची तक्रार मिरा साहेबराव बोके यांनी केली असून, त्यांनी आरोप केला आहे की हेमंत राजपूत याने योजनेचा गैरफायदा घेत त्यांना २५०० रुपये लाच म्हणून मागितली.

आज सायंकाळी ५:३० वाजता एसीबीच्या पथकाने आरोपीला यथासांग पुराव्यासह ताब्यात घेतले आहे. आरोपी कनिष्ठ सहाय्यक हेमंत राजपूत यांच्यावर समाज कल्याण विभागातील पदाचा गैरवापर करून जनतेशी अन्याय केल्याचा आरोप आहे. ही घटना ग्रामस्थांमध्ये मोठा ताण निर्माण करत असून, योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.एसीबी अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करीत आरोपीविरुद्ध कठोर कारवाई होईल, अशी माहिती दिली. या प्रकारामुळे सरकारच्या जनकल्याणकारी योजनेचा गैरवापर उजेडात आला असून, यापुढे याप्रमाणे भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!