चिखली (हॅलो बुलडाणा / सय्यद साहिल) तालुक्यातील साखळी खुर्द येथील युवक शिवा राम भारती याने काल रात्री सानिया नर्सिंग कॉलेजच्या मागे, रवी खरात यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, स्थानिकांत विविध चर्चांना उधाण आलं.
शिवा राम भारती याचा मृतदेह शेताला केलेल्या कुंपणाच्या लोखंडी अँगलला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्येच्या पाठीमागचं नेमकं कारण काय, हे शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.