spot_img
spot_img

💥BREAKING! पोउपनि गजानन माळी पोलीस दलातून निलंबीत!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बेशिस्त गैरवर्तणूक प्रकरणी स फौ. गजानन माळी यांना बुलढाणा पोलीस दलातून निलंबीत करण्यात आले आहे.स. फौ. गजानन माळी यांनी 23 मे रोजी पो.स्टे. मलकापूर शहर हद्दीत एका 27 वर्षीय तक्रारदारा कडून रेतीवाहतूक करण्यासाठी लाचेची मागणी करुन ती रक्कम पंचासमक्ष स्विकारली होती.ही लाच स्वीकारल्या प्रकरणी सहा. पो. उपनि. गजानन माळी (नेमणूक स्था. गु. शा. बुलढाणा) यांचे विरुध्द पो.स्टे. मलकापूर शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम

1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा नोंद आहे. या प्रकरणी सहा. पोउपनि गजानन माळी यांनी कर्तव्या दरम्यान अत्यंत बेशिस्त, बेजबाबदारपणाचे आचरण केल्याने त्यांना मा. पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेशान्वये
बुलढाणा जिल्हा पोलीस दलातून निलंबीत करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!