डोणगाव (हॅलो बुलडाणा/अनिल राठोड) डोणगाव महामार्गावर खड्डे पडले.बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी होते.अरुंद रस्ता व अतिक्रमण असले तरी, यंत्रणेने उपाययोजना केल्या नाही. त्यामुळे ही समस्या बिकट बनली आहे.
कायद्याअंतर्गत, वाहतूक कर्तव्ये नागरी पोलिसांना सोपवण्यात आली, ज्यांना रस्त्यावरील वाहतुकीचे नियमन करण्याचे, जनतेने रस्त्याचे नियम पाळले आहेत याची खात्री करण्याचे, रस्ते वापरकर्त्यांकडून होणारा अडथळा किंवा उपद्रव रोखण्याचे आणि रस्ते सुरक्षित ठेवण्याचे काम देण्यात आले आहे.परंतु वाहतूक पोलीस काय करतात? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय डोणगाव बस स्थानक परिसरात अतिक्रमण निर्मूलन झाले नाही. येथील रस्ते खड्डेमय झालेत. अडथळ्यांची शर्यत पार करून रस्ता ओलांडल्या जातो.मेहकर येथे अतिक्रमण मोहीम राबविली.तशी मोहीम डोणगावात राबवली तर बस स्थानक परिसर मोकळा श्वास घेऊ शकते.शिवाय वाहतूक पोलिसांनी डोळ्याला लावलेली गांधारीची पट्टी सोडून आपले कर्तव्य पारदर्शीपणे आणि प्रभावी पार पाडावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.