देउळघाट (हॅलो बुलडाणा /इमरान खान) चांभारवाडा परिसरात आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली असून, 28 वर्षीय पंकज गणेश काकडे याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी अंदाजे 9:30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.पंकज काकडे याच्या आत्महत्येची माहिती त्याचा काका दिलीप काकडे यांनी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तोंडी रिपोर्टद्वारे दिली. दिलीप काकडे यांच्यानुसार, कामावरून घरी परतल्यानंतर त्यांना गल्लीमध्ये एकच खळबळ उडाल्याचे दिसले. चौकशी केली असता रावसाहेब नारायण जाधव यांनी त्यांना धक्कादायक बातमी दिली – पंकजने गळफास घेतला आहे.
दिलीप काकडे व रावसाहेब जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, दुसऱ्या मजल्यावर लोखंडी पाइपाला दोरी लावून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.सध्या पंकजच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मृताच्या नातेवाईकांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. बुलढाणा ग्रामीण पोलीस तपास करत असून, ही आत्महत्या की काही वेगळा प्रकार याचा शोध घेतला जात आहे.