spot_img
spot_img

💥अरेरे..दिव्यांगाला मारहाण! – काय आहे प्रकरण?

चिखली (हॅलो बुलडाणा) हात पाय शाबूत नसलेल्या दिव्यांग बांधवांना शासन विविध योजनेतून लाभ देतात. मात्र प्रशासकीय यंत्रणेतील एका कर्मचाऱ्याने दिव्यांगाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

तालुक्यातील आसोला नाईक गावात कर्तव्य बजावत असलेल्या दिव्यांग ग्रामसेवक संतोष सवडतकर यांना भरदिवशी मारहाण केल्याची धक्कादायक घटना २२ मे रोजी घडली. पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल सर्वेक्षणाचे काम सुरू असताना, आरोपी जाफरखा आमदखा याने संतोष सवडतकर यांच्याशी शिवीगाळ करत कॉलर पकडून मारहाण केली आहे.या घटनेला काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतच्या नाल्याच्या घाण पाण्यावरून झालेल्या तक्रारीचा राग कारण ठरले. दुपारी २.३० वाजता अल्ताफखा उस्मानखा यांच्या घरी सर्वेक्षण सुरू असताना आरोपीने अचानक हल्ला चढवला. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत भांडण थांबवले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष भगवान डोंगरदिवे यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठले. ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीविरुद्ध कलम 132, 115(2), 351 BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!