spot_img
spot_img

💥सावधान! चप्पल-बूट घालताना लक्ष ठेवा – विषारी साप निघाला बुटातून!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरात आज एक धक्कादायक घटना घडली असून, प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला आहे. प्रसिद्ध उद्योजक आशीष खडसे यांना कामानिमित्त घराबाहेर जायचे होते. नेहमीप्रमाणे त्यांनी बूट घालण्यासाठी हातात घेतले आणि आतमधून काहीतरी हलल्याची जाणीव झाली. त्यांनी सावधगिरीने बूट तपासला असता आत चक्क विषारी जातीचा साप आढळून आला! आशीष खडसे यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आणि एक जीव वाचला. ही घटना सर्वांसाठी धडा ठरली आहे.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साप घरात शिरण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे नागरिकांनी चप्पल, बूट घालताना विशेष दक्षता बाळगावी.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!