spot_img
spot_img

💥’कानून के हात लंबे होते है!’ पण ‘यांची’ कॉलर पकडलीच नाही! – गत वर्षी झाली होती 2 लाख 11 हजारांची घरफोडी! – नवे एसपी निलेश तांबे शोध लावतील का?

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कटीबध्द असतात. ते शोधमोहीम राबवून अनेक क्लिष्ट प्रकरणाचा गुंता सोडवून अट्टल गुन्हेगारांना जेरबंद करतात. परंतु काही प्रकरणांचा शोध लागत नाही. बुलढाण्यातील सन 2024 मध्ये झालेल्या एका घरफोडीचा अद्याप शोध लागला नसल्याने फिर्यादी प्रवीण रामदास खेडेकर यांनी पोलिस प्रशासनातील विविध खात्याप्रति नाराजी व्यक्त केली असून,नवे एसपी निलेश तांबे शोध लावतील का?असा प्रश्न उपस्थित केला आहे.

शासकीय कर्मचारी असलेले प्रवीण रामदास खेडेकर हे येथील बीयानडसी शासकीय निवासस्थान, कॉर्टर नंबर 2/6 पाण्याच्या टाकीजवळ राहतात. त्यांच्या घरात 30 ऑगस्ट 2024 रोजी घरफोडी होऊन नगदी रोख रकमेसह सोने- चांदी असा एकुण 2 लाख 11 हजारांचा ऐवज अज्ञात गुन्हेगाराने लंपास केला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 30 ऑगस्ट रोजी अज्ञात आरोपी विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. प्रवीण रामदास खेडेकर हे चुलत भावाच्या तेरवीच्या कार्यक्रमाला कुंटुंबासह अंत्री खेडेकर या गावाला गेले होते. त्या दिवशी संध्याकाळी ही घरफोडी झाली होती.परंतु 2025 या वर्षातील मे महिना संपत येत असूनही,या प्रकरणी पोलिसांनी अद्यापही आरोपींचा शोध लावला नाही. आता कर्तव्यदक्ष असलेले निलेश तांबे हे बुलढाणा जिल्ह्याला नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून लाभले आहेत. त्यांनी याप्रकरणी सखोल तपास करून न्याय देण्याची मागणी प्रवीण खेडेकर यांनी केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!