जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) सुसाट टिप्परने दोघांना चिरडल्याने ते जखमी झाल्याची घटना दादुलगाव येथे 22 मे रोजी दुपारी घडली. काशिनाथ झाल्टे (40),समाधान काळे (55) रा. दादुलगाव असे जखमींची नावे आहेत.दरम्यान संतप्त नागरिकांनी टिप्परला पेटवून दिले होते.
दोघेही चर्चा करीत हनुमान मंदिराजवळील वडाच्या झाडाखाली बसले होते.दरम्यान मानेगाव येथून सुसाट वेगात आलेल्या एम एच 28 बीबी 2860 क्रमांकाच्या टिप्परचालकाचे स्टेरिंग वरील नियंत्रण सुटल्याने टिप्पर थेट काशिनाथ झाल्टे ,समाधान काळे यांच्या दिशेने आले. अपघात झाल्याने दोघेही जखमी झाले आहेत. यावेळी सतर्क नागरिकांनी त्यांना खामगाव रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.काही वेळातच संतप्त नागरिकांनी अपघात ग्रस्त टिप्परला पेटवून दिले.यावेळी ठाणेदार श्रीकांत निचळ टीम सोबत घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.पुढील तपास सुरू आहे.