बुलढाणा (हॅलो बुलढाणा) येथील भरोसा सेलमध्ये दीड वर्षामध्ये 1340 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी 450 कुटुंबांचे समुपदेशन करुन महिलांचे संसार पुन्हा सुरळीत सुरु झाले आहेत, तर 87 कुटुंबांचा समझोता करुन कौटुंबिक वादाचा निपटारा केला आहे.
महिलांवर होणाऱ्या कौटुंबिक अन्याय अत्याचाराच्या संदर्भात महिलांना न्याय देण्यासाठी भरोसा सेलची स्थापना करण्यात आली आहे.‘भरोसा सेल’च्या माध्यमातून महिलांना आणि बालकांना सुरक्षितता पुरवितांनाच गुन्ह्याच्या प्रतिबंधासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात येत आहे. भरोसा सेल कडे दीड वर्षात एकूण 1340 अर्ज दाखल झाले. त्यापैकी 171 प्रकरणात कोर्ट समज देण्यात आली.190 प्रकरणात कायदेशीर व्यवहार पत्र करण्यात आले. कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 अंतर्गत 87 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे.
▪️ भरोसा सेल देतेय मानसिक बळ!
संकटात सापडलेल्या महिला व मुलांकरिता पोलिस, वैद्यकीय सेवा, मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशन, विधी तज्ज्ञ, संरक्षण अधिकारी व पुनर्वसन या सेवा तात्काळ पुरवून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मदतनीस ठरत आहे. हिंसाचाराचे लक्ष्य ठरलेल्या महिला व मुलांना भरोसा सेलच्या आधारामुळे अत्याचारा विरुध्द लढण्यासाठी मानसिक बळ निर्माण होत आहे. याकरिता भरोसा सेल चे PSI अश्विनी धोंडगे,
ASI अलका वाघमारे,
ASI कविता मोरे,
ASI कल्पना गवई,
LHC सूर्यकिरण साबळे प्रयत्न करीत आहेत.